नवी दिल्ली
:रिलायन्स जिओने बाजारात आपला नवीन वायफाय मेश राउटर सादर केला आहे. यामध्ये कंपनीने फायबर टू होम सर्व्हिससोबत हा राउटर दाखल केला असल्याची माहिती दिली आहे. सदरच्या राउटरमधून नेटवर्कची रेंज सर्वाधिक आणि सोबत इंटरनेट स्पीडचा वेग अधिक राहणार असल्याचे सांगितले आहे.
जिओच्या या वायफाय मेश राउटरची किमत ही 2,499 रुपये असून यावर जिओचा लोगो लावण्यात आला आहे.









