ऑनलाईन टीम / दिसपूर :
आसामच्या शिवसागर जिल्ह्यातील लकुआ क्षेत्रात रिंग साईटवरून नैसर्गिक वायू आणि तेल कंपनीच्या (ONGC) तीन कर्मचाऱ्यांचे आज पहाटे अपहरण करण्यात आले आहे. उल्फाच्या सशस्त्र बंडखोरांकडून या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अपहरण झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन कनिष्ठ सहायक अभियंते आणि कनिष्ठ तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. ज्या गाडीतून कर्मचाऱ्यांचे अपहरण झाले, ती गाडी आसाम-नागालँडच्या सीमेजवळ आढळून आली आहे. सीमेजवळ असलेल्या निमनगढ जंगलाजवळ अपहरकर्त्यांनी ही गाडी सोडून दिली असून, पोलिसांकडून कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.