ऑनलाईन टीम / गुवाहटी :
आसाम मधील मोरेगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. यापूर्वी बुधवारी देखील आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरेगावमध्ये सकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के जाणवतच लोक आपापल्या घरातून बाहेर आले. तर अनेक जण आपल्या घरात झोपलेले होते. त्यामुळे त्यांना भूकंप झाल्याची जाणीव झाली नाही.









