नवी दिल्ली
: बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी यावर्षी होणारी आशिया चषक स्पर्धा रद्द झाली असल्याचे बुधवारी जाहीर केले. येत्या सप्टेंबरमध्ये त्याचे आयोजन केले जाणार होते.
‘सप्टेंबर मे होने वाला आशिया चषक कॅन्सल हो चुका है,’ असे त्यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले. या स्पर्धेच्या यजमानाबाबत पाकचे नाव घेतले जात असले तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धाही कोरोना महामारीच्या कारणास्तव रद्द हेण्याची शक्यता आहे. आशिया चषक रद्द झाले असल्याने आता बीसीसीआयला याच कालावधीत पूर्ण लांबीची आयपीएल स्पर्धा भरविण्याची संधी मिळणार आहे.









