प्रतिनिधी/कोल्हापूर
आशा कर्मचारी महिलांना 50 लाखापर्यंत विमा कवच देण्यात येणार आहे. 31 मार्च पासून ही योजना सुरू आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. जिह्यातील 3 हजार महिलांना याचा लाभ होणार आहे.
देशभरात कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने हाहाकार माजवला आहे. त्याच्याशी दोन हात करताना आरोग्य कर्मचारी अधिकारी डॉक्टर यांना लागण होऊ शकते. यात त्यांचा प्राणही गमावून शकतो त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी 50 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
30 मार्च पासून पुढे नव्वद दिवस ही योजना सुरू राहणार आहे. भारत सरकार आणि न्यू इंडिया इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हल वरती घर तो घर आणि फेस टू फेस सर्वे करणाऱ्या आशा वर्कर्स गटप्रवर्तक यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे असंतोष होता जीव धोक्यात घालून गेली महिनाभर अशा कर्मचारी कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत मात्र त्यांचाकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, गुरुवारी आरोग्य सेवा अभियान संचालकांनी तातडीने निर्णय घेत ग्रामीण भागात काम करणाऱ्या अशा वर्कर्स गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आरोग्य कर्मचारी यांचा या विमा योजनेत सहभागी करून घेण्याचे आदेश काढले त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आरोग्य सेवा अभियान संचालनालयाचे आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून या विमा योजनेचा लाभ देण्याचे कळवले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 3000 अशा कर्मचारी गटप्रवर्तक यांना त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळालेला आहे.
अखेर लढ्याला न्याय मिळाला
रात्रीचा दिवस करून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही कोरोनाच्या लढ्यात सहभागी झालो आहे उशिरा का होईना केंद्र सरकारने आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला 50 लाखापर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या त्यांच्या कुटुंबांना दिलासा दिला आहे – नेत्रदीपा पाटील, अध्यक्षा आशा वर्कर संघटना कोल्हापूर जिल्हा
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








