मुंबई/प्रतिनिधी
क्रूझवरील दृग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला जामीन द्यायचा की नाही याचा निर्णय विशेष न्यायालय २० ऑक्टोबरला देणार आहे. या ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून (NCB) अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. क्रूझ रेव्ह पार्टी (Cruise Rev Party Case) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. शाहरुख खान (shahrukh khan) याचा मुलगा आर्यन खानचे (Aryan Khan) देखील यावेळी समुपदेशन करण्यात आले असता त्याने एनसीबी आणि सामाजिक संस्थेला चांगला माणूस होईल तसेच सर्वाना गर्व होईल असे काम करून दाखवेल असा शब्द आर्यन खान याने दिला असल्याची खात्रीपूर्वक माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.
आर्यन खान आणि त्याचासोबत आठ जणांना एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आर्यन आणि त्याच्या सोबत अटक करण्यात आलेले आठ ही जण न्यायालयीन कोठडीत आहे. अटक करण्यात आलेल्या आर्यन खान आणि इतरांचे एनसीबी कोठडीत असताना अमली पदार्थ सेवन केल्याने त्याचे स्वतावर व समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत एका सामाजिक संस्था आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले.
आर्यन खान याला समुपदेशन करताना स्वतः एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे (sameer wankhede ncb officer) उपस्थित होते. सामाजिक संस्था आणि एनसीबीने आर्यन खान याचे समुपदेशन केले. यावेळी आर्यन खान हा भावुक झाला होता. आर्यनने इथून बाहेर पडल्यानंतर गरीबांसाठी आर्थिक व सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करेन. तसेच सर्वांना आपला गर्व वाटेल, असेच काम करेन, असा शब्द आर्यनने समुपदेशनादरम्यान दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आर्यनने यावेळी ‘मी येथून बाहेर पडल्यानंतर चांगला व्यक्ती बनवून दाखवेन, चांगली कामे करीन, एनसीबीच्या अधिकऱ्याना गर्व वाटेल, असे काम करण्याचा प्रयत्न करेन’, असा शब्द आर्यन खान याने समुपदेशन करताना एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे आणि सामाजिक संस्थेला दिले आहे. अशी माहिती एनसीबीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
.