वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2020 मध्ये पेटीएमची सहयोगी कंपनी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडचा तोटा कमी होऊन 2,942.36 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीचा एकत्रित तोटा हा 4,217.2 कोटी रुपयांवर राहिला होता. रजिस्ट्रर ऑफ कंपनीज फायलिंगच्या माहितीनुसार मार्केट इंटेलिजेन्स फर्म टॉफ्लरकडून ही माहिती देण्यात आली आहे.
फ्लिपकार्ट फोनपे आणि गुगलपेसोबत टक्कर देणाऱया पेटीएमचा आर्थिक वर्ष 2020 मध्ये एकत्रित महसूल 3,628.85 कोटी रुपयांवर राहिला आहे. आर्थिक वर्ष 2019 च्या 3,579.67 कोटींच्या तुलनेत यामध्ये 1.3 टक्क्यांची वाढ राहिली आहे.
स्टँड-अलोन आधारावर महसूल
रेग्युलेटरी डॉक्युमेंटच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार स्टँड-अलोन आधारावर 2019-20 मध्ये कंपनीचा महसूल 3,350.59 कोटी रुपयांवर राहिला होता.
स्टँड अलोन आधारे पेटीएमच्या तोटय़ात सुधारणा झाली असल्याची माहिती आहे.









