मुंबई : आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव आहूजा यांचा कार्यकाळ येत्या 25 मार्च 2022 पासून पुन्हा तीन महिन्याने वाढविण्यात येणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे.
25 डिसेंबर रोजी बँकेचे माजी प्रमुख विश्ववीर आहूजा हे अचानक बाहेर पडल्याने बँकेने एमडी व सीईओ म्हणून राजीव आहूजा यांना नियुक्त केले होते. यासोबतच आरबीआयने आपले मुख्य जनरल मॅनेजर योगेश दयाल यांची दोन वर्षांसाठी आरबीएलच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली होती.
डिसेंबरमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीमध्ये आरबीएल बँकेचा निव्वळ नफा हा 5 पटीने वधारुन 156 कोटी रुपयांवर राहिला आहे. यामध्ये एकूण जमा रक्कम 3 टक्क्यांनी घसरुन 73,639 कोटी रुपयांवर राहिल्याची नेंद करण्यात आली आहे.









