क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
ऑनलाईन टीम/तरुण भारत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीची केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अनेक नव्या उपाययोजना आणि घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजिटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी जारी करणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजिटल रुपीची घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, अलीकडच्या काळात देशात क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात या विषयी घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल चलन आणले जाणार असल्याची चर्चा होती. अखेर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात त्यावर शिक्कातमोर्ब केले आहे.
त्यानुसार लवकर रिझर्व्ह बँकेद्वारे ब्लॉकचेन आणि अन्य तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल चलन लाँच करण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल रुपी लाँच करण्यात येईल. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्याचा नवा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या क्रिप्टो चलनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. तसेच क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी सांगित