कोरोनाकाळानंतर यावषी 100.40 टक्के उद्दिष्ट पूर्ण : मागीलवर्षी 94 टक्केच गाठण्यात यश
प्रतिनिधी / बेळगाव
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांना फटका बसला होता. आरटीओ विभागालाही याची झळ बसली होती. आता कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने आरटीओ विभागाने आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी 100.40 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून मागील वषी 94 टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. मात्र, अजूनही 1 कोटींचा महसूल जमा होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्मयता आहे. त्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. यामध्ये सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. त्यामुळे कधी एकदा कोरोनाचे उच्चाटन होते, असेच साऱयांना वाटू लागले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये दोन महिन्यात आरटीओच्या महसुलाला फटका बसला असला तरी तिसऱया लाटेत मात्र अधिक फरक पडला नाही.
2020-21 सालात 94.34 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. 2021-22 सालात 100.40 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 13109.77 लाखाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यामध्ये 13162.60 लाखांचा कर गोळा करण्यात आल्याने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वाहन आणि सारथी अशा दोन्ही ऑनलाईन वेबसाईट्सच्या माध्यमातून कर गोळा करण्यात आला आहे. येत्या चार दिवसांत आणखी एक कोटीचा कर गोळा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
आता संभाव्य चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव आरटीओ विभागाला कोरोनाकाळात कोटीचा फटका बसला आहे. त्यामुळे ही कसर भरून काढण्याचे मोठे आव्हान अधिकाऱयांसमोर उभे ठाकले होते. मात्र, आरटीओ विभागाने आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड केली.
वाहनांच्या खरेदीमुळे महसुलात वाढ
बेळगाव तालुक्मयात वाहनांच्या खरेदीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून आरटीओ कार्यालयात नोंदही होत आहे. अनेक वाहनांचे थकीत करही भरण्यात येत असल्यामुळे महसुलात भर पडत आहे. दरवषी बेळगाव आरटीओ कार्यालयात कोटीहून अधिक कर मिळत असतो. मात्र, कोरोनामुळे सर्वच व्यवहार आणि वाहन नोंदणी तसेच वाहन परवाना देणे बंद असल्याने समस्या निर्माण झाली होती. आता बेळगाव शहर व खानापूर तालुक्मयात वाहने घेण्याकडे कल वाढल्याने महसुलात वाढ होत आहे. याचबरोबर वाहन परवाना आणि इतर बऱयाच कामांना चालना देण्यात आल्याने 100.40 टक्के कर गोळा करण्यात आला.
2021-22 सालात जमलेल्या कराची आकडेवारी
| महिना | देण्यात आलेले उद्दिष्ट (लाखात) | जमा झालेला कर (लाखात) | टक्केवारी |
| एप्रिल | 1092.48 | 1106.9 | 101.25 |
| मे | 1092.48 | 274.9 | 25.16 |
| जून | 1092.48 | 448.72 | 14.07 |
| जुलै | 1092.48 | 1249.86 | 114.41 |
| ऑगस्ट | 1092.48 | 1241.77 | 113.66 |
| सप्टेंबर | 1092.48 | 1388.56 | 127.1 |
| ऑक्टोबर | 1092.48 | 1219.26 | 111.6 |
| नोव्हेंबर | 1092.48 | 1381.91 | 126.49 |
| डिसेंबर | 1092.48 | 1258.33 | 115.18 |
| जानेवारी | 1092.48 | 1176.48 | 107.69 |
| फेब्रुवारी | 1092.48 | 1186.33 | 108.59 |
| मार्च | 1092.48 | 1230.38 | 112.62 |
| एकूण | 13109.77 | 13162.6 | 100.4 |
उद्दिष्टापेक्षा अधिक कर गोळा करण्यासाठी धडपड : आरटीओ मगदूम
कोरोनामुळे आरटीओ विभागाला कोटय़वधीचा फटका बसला होता. ही कसर भरून काढणे आमच्यासमोर आव्हानच होते. अधिकाऱयांनी मोठे परिश्रम घेऊन हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक कर गोळा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपले सहकारी व इतरांच्या सहकार्याने ही जबाबदारी लिलया पेलू. अधिक कर सरकारला जमा होईल, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. येत्या चार-पाच दिवसांत आणखी एक कोटीचा महसूल गोळा करण्यासाठी आमची धडपड असणार आहे.









