प्रतिनिधी /पणजी
पर्वरी येथील आरजी स्टोन हॉस्पिटल गोवातर्फे युनिटमध्ये रेट्रो पेरिटोनियल डिसेक्शनसह टोटल लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
एका 50 वर्षाच्या महिलेला संपूर्ण महिनाभर प्रति योनीतून जास्त रक्तस्त्राव होत असल्याच्या तक्रारी होत्या. पुढील तपासणी केल्यावर, अल्ट्रासाऊंड केल्यानंतर ओटीपोटात नाभीसंबंधीच्या हर्नियासह पोस्टरियर इंट्राम्युरल फायब्रॉइडसह गर्भाशयात दिसून आला. डॉ. मांगिरीश केंकरे आणि डॉ. हेमचंद्र मेनकर यांचा समावेश असलेल्या आमच्या सर्जिकल टीमने जीएअंतर्गत योनिअल हिस्टरेक्टॉमी अंबिलिकल हर्निया रिपेअरलॅप्रोस्कोपिक बायलेटरल सॅल्पिंगो ओफोरेक्टॉमीची योजना आखण्यात आली. सदय शस्त्रक्रिया 6 फेब्रुवारी 2022 रोजी यूटय़ूबवर थेट प्रसारित करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यावेळी रूग्णाने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. 48 तासांच्या आत स्थिर आणि समाधानकारक स्थितीत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
200 पेक्षा जास्त दर्शकांनी हा व्हिडिओ यूटय़ूबवर लाईव्ह पाहिला. हा कार्यक्रम केवळ शैक्षणिक आणि प्रशिक्षण हेतूंसाठी आयोजित करण्यात आला होता.
डॉ. मंगिरिश केंकरे (लॅप्रोस्कोपिक स्त्रीरोगतज्ञ, आरजी स्टोन हॉस्पिटल) आणि डॉ. हेमचंद्र (कन्सल्टंट ऍनेस्थेसिया) यांनी पॅरा रेक्टल, पॅरा वेसिकल स्पेसचे रिअल टाईम डिसेक्शन आणि गर्भाशयाच्या धमनीच्या लिगेशनचे प्रात्यक्षिक केले. प्रश्नोत्तराच्या सत्राने सत्र संपले.









