भव्य मोर्चा काढण्याचा सकल मराठा समाज बैठकीत निर्धार, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात उद्या कार्यकर्त्यांची बैठक
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी 16 जुन रोजी पुकारलेल्या कोल्हापुरातील मोर्च भव्य स्वरूपात काढण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. ताराबाई पार्क येथील एका हॉटलच्या हॉलमध्ये मंगळवारी मोर्चाची दिशा आणि नियोजनासाठी तातडीची बैठक झाली. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामध्ये दि. 10 जून रोजी गुरूवारी सकाळी 11 वाजता सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेण्याचा निर्णयाही यावेळी झाला. खासदार संभाजीराजे यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे.
नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळ येथून 16 जूनला सकाळी मोर्चाला सुरवात होणार असून जिल्हाधिकाऱयामध्ये मोर्चाची सांगता होणार आहे.
मोर्चा काढू नये असे राज्यशासनाला वाटत असल्यास खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या प्रमुख पाच मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा, असेही सरकारला आवाहन करण्यात आले. या बैठकीला सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील, सचिन तोडकर, दिलीप देसाई, सुजित चव्हाण, महेश जाधव, श्रीनिवास साळोखे, बाबा पार्टे, फत्तेसिंग सावंत, स्वप्नील पार्टे, बाळ घाटगे, मधुकर बिरंजे, सुशिल भांदिगरे उपस्थित होते.
बैठकीतील प्रमुख निर्णय
-खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या पाच मागण्या राज्यशासनाने 15 जूनपर्यंत मान्य कराव्यात.
-अन्यथा 16 जुन रोजी सकाळी 11 वाजता शाहू समाधी स्थळ येथून मोर्चाल सुरवात
-खासदार संभाजीराजे यांनी आत्मकलेशला बसू नये, आता थेट आरपारच्या लढाई सुरू करावी.
-मराठा सदस्य नसल्याने मागासवर्गीय आयोगाची समिती बरखास्त करावी.
-आमदार, खासदार यांनी समाजासाठी काय करणार जाहीर करावे. मराठा म्हणून आंदोलनात सहभागी व्हावे. – कोल्हापूरातील मोर्चा राज्याला दिशा देणार ठरणार