ऑनलाईन टीम / पुणे :
आयुर्वेदिक भस्म विचारमंच स्थापनेसाठी १ फेब्रुवारी रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली असून इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती डॉ.उल्हास जोशी यांनी दिली.
आयुर्वेदिक भस्मे एक उपयुक्त औषधी कल्पना असून हि सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आयुर्वेदिक भस्म करण्याच्या पद्धती, चांगल्या कच्चा मालाची उपलब्धता, त्यांची शुध्दता अशा बरयाच बाबींचा उहापोह करणे आवश्यक आहे. त्यासाठी भस्मे तयार करणारे व वापरणारे वैद्य व कारखाने यांनी एकत्र येवून त्यावर विचारांचे आदान प्रदान करणे आवश्यक आहे.
इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशन असा एक कायमचा विचारमंच तयार करणार आहे.ज्यांना हयात भाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी एकत्र यावे. यासाठी पहिली बैठक १ फेब्रुवारी रोजी, शनिवारी, दुपारी 3 ते 5 या वेळात आयोजित केली आहे .इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशन ,शिवाजीनगर येथे हि बैठक होईल .