वार्ताहर / पाचगाव
आयसोलेशन चौक ते आर के नगर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणाची काहीजणांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे पन्नास जणांनी आपल्या इच्छेनुसार जागेची आखणी करून त्या ठिकाणी बांबू उभा केले आहेत आणि त्यांना दोऱ्या बांधून स्वतःची जागा निश्चित केली आहे.
आयसोलेशन चौक ते आर के नगर रत्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आर के नगर , पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, गोकुळ शिरगावकडे जाण्यासाठी नागरिक या रस्त्याचा वापर करतात. के आय टी कॉलेज, भारती विद्यापीठ तसेच मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही वर्दळ या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात असते. यामुळे काही जणांनी या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.
त्यासाठी काहीजणांनी आपल्या इच्छेनुसार रस्त्याच्या दुतर्फा बांबू उभा करून त्यांना दोऱ्या बांधून स्वतःची जागा निश्चित केली आहे. काही फाळकूट दादा तर मोक्याच्या जागेवर आक्रमण करून नंतर ही जागा भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. या रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामध्ये फळकुट दादांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यासाठी जागा निश्चिती केल्याचे समजते. हे अतिक्रमण झाल्यास हा रस्ता अरूंद होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागणार आहे. वाढत्या वाहतुकीमुळे या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे मात्र या रुंदीकरणा ऐवजी या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण होऊन हा रस्ता अरुंद होत आहे. अतिक्रमणाच्या या जागा निश्चितीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे .त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होण्याची शक्यता आहे . अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









