नवी दिल्ली
आयसीआयसीआय बँक यांनी मंगळवारी एटीएममधून पैसे काढण्याची कार्डलेस ही नवीन सुविधा सुरु केली असल्याची घोषणा केली आहे. ही सुविधा ग्राहकांना बँकेकडून मोबाईल बँकिंग अप्लिकेशन ‘आयमोबाईल’सह बँकेच्या तब्बल 15 हजारहून अधिक एटीएमवर ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती बँकेनी दिली आहे. ज्या ग्राहकांना आपल्यासोबत डेबिट कार्डचा वापर नको आहे. त्यांच्यासाठी ही विशेष सुविधा राहणार आहे. नवीन सुविधा वापरुन ग्राहकांना 20 हजार रुपयापर्यंत देवाण-घेवाण करण्याच व्यहार करता येणार आहे.








