अबिदझेन
आयव्हरी कोस्ट देशाचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू इग्नेस गिडी यांचे वयाच्या 64 व्या वषी अल्पशा आजाराने निधन झाले. सदर माहिती आयव्हरी कोस्टचा फुटबॉलपटू आणि गिडी यांचा स्नेही डिडीयर ड्रोग्बाने दिली. गिडी यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीमध्ये 30 सामन्यात आयव्हरी कोस्टचे प्रतिनिधित्व केले. गिडी यांच्या शानदार कामगिरीमुळे आयव्हरी कोस्टने मालीचा पराभव करून 1978 च्या आफ्रिकन चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती.









