मुंबई
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीने अलीकडेच आरोग्यदायी खाद्य उत्पादनांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया योगा बार कंपनीचे पूर्णपणे अधिग्रहण केले आहे. स्प्राऊट लाईफ फुडस् प्रायव्हेट लि. अंतर्गत योगा बार ब्रँड कार्यरत आहे. योगा बारच्या ब्रँड नावानेच यांची उत्पादने गेल्या तीन-चार वर्षांपासून बाजारामध्ये पाहायला मिळतात. सदरचे अधिग्रहणाचे कार्य हे आगामी काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये केले जाणार आहे. यासाठी सुरुवातीला 175 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे समजते.









