10 टक्के वाढ :क्लाऊड कम्प्युटिंगच्या क्षेत्रातील तज्ञांना मागणी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
नव्या वर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचेही महत्त्व अधिक वाढणार असल्याने या क्षेत्रातील पदवीधरांना यंदा दमदार मागणी नोंदवली जाणार आहे. आयटी पदवीधरांच्या भरतीत 2021 मध्ये 10 ते 12 टक्के वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
2021 मध्ये आयटी उद्योग दोन अंकी संख्येत विकास साध्य करू शकतो. डिजिटल व्यवहारांना अधिक गती येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लागणार आहे. कर्मचारी पुरवठा करणाऱया टीमलीज संस्थेने या संदर्भातील पाहणी केली असता आयटी क्षेत्रामध्ये पदवीधरांना मागणी वाढणार असल्याचे दिसून आले आहे. डाटा सायन्सेस आणि डाटा ऍनालीस्ट यांच्या मागणीत 45 टक्के वाढ होणार असल्याचे समजते. अंदाजे 95 टक्के इतक्मया संघटनांनी येणाऱया बारा महिन्यांमध्ये क्लाऊड कम्प्युटिंगशी संबंधित कुशल तज्ञांना घेण्याचे ठरवले असल्याचे समजते. त्यामुळे या क्षेत्रात असणाऱया तज्ञांना अपेक्षित नोकरीची संधी नव्या वर्षात उपलब्ध होणार आहे. सायबर सिक्मयुरिटी प्रोफेशनल, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स याप्रकारच्या तज्ञांनाही पुढील काळात मागणी असणार आहे. कोरोनामुळे सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आयटी क्षेत्रातील व्यवहार जवळपास पूर्णपणे थंडावले होते. पण सप्टेंबरनंतर आयटी उद्योगाचा व्यवहार कोरोनापूर्व 75 टक्के इतका गती घेताना दिसतो आहे. येणाऱया आणखी काही महिन्यांमध्ये आयटी उद्योग अधिक गतिमान होताना दिसेल.









