नवी दिल्ली
चिनी कंपनी ‘आयकू’चा पहिला स्मार्टफोन आयकू-3 भारतीय बाजारात सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4-जी आणि 5-जी वेगवेगळे मॉडेल सादर केले आहेत. या फोनची सुरुवातीची किंमत 36,999 रुपये असल्याची माहिती कंपनेने दिली आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान स्नॅपड्रगन 865 लावलेला आहे. सदरचा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. या स्मार्टफोनची खरेदी कंपनीच्या कार्यालयीन वेबसाईटसह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 4 मार्चपासून उपलब्ध होणार आहे.
- डिस्प्ले : 6.44 इंच एचडीआर 10 सुपर एमोलेड
- रॅम/रोम : 8 जीबी128जीबी,8जीबी256जीबी,12जीबी256जीबी
- प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रगन 865
- कॅमेरा : 4813132एमपी रियर, 16 एमपी फ्रन्ट
- ओएस : अँड्राईड 10 बेस्ड आयकू यूआय 1.0
- बॅटरी : 4440 एमएएच, चार्जिंग 15 मि. 50 टक्के
मॉडेल किंमत
- 8जीबी128जीबी (4जीफोन) 36,990
- 8जीबी256जीबी (5जी फोन) 39,990
- 12जीबी256जीबी(5जी फोन) 44,990