नवी दिल्ली
फर्निचरच्या व्यवसायातील कंपनी आयकियाचा पहिला वहिला भारतातला मॉल नोएडात उभारला जाणार आहे. यासाठी कंपनीने 50 हजार चौ. मीटरची जागा नोएडा प्राधिकरणाकडून खरेदी केली असल्याचे समजते. आयकिया येणाऱया काळात यासाठी 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. याअंतर्गत कंपनी 2 हजार जणांना रोजगार मिळवून देणार आहे. सदरच्या जागा व्यवहारात नोएडा प्राधिकरणला आयकियाकडून 850 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 5 हजार कोटींची गुंतवणूक ही 7 वर्षात टप्याटप्याने केली जाणार आहे.









