भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमेधाने अल हमीद नौकेच्या चालक दलाला वाचविले आहे. सोमालियाच्या किनाऱयानजीक संकटात सापडलेल्या या व्यापारी नौकेवरील चालक दलाच्या सदस्यांना आयएनएस सुमेधाने वाचविले आहे. अल हमीद नौकेची नौदलाच्या तंत्रज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. या नौकेच्या चालक दलात 13 भारतीयांचा समावेश आहे. भारतीय नौदलाने अल हमीद नौकेवरील कर्मचाऱयांना पेयजल तसेच वैद्यकीय मदत उपलब्ध केली आहे. सोमालियाच्या क्षेत्रात सागरी चाच्यांचा सर्वाधिक धोका आहे. या क्षेत्रात भारतीय नौदलाने सागरी वाहतूक सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









