ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत.करशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरु आहेत. रशियाने युक्रेनला शरण येण्यास सांगितले आहे. पण युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्धही जिंकू असा विश्वास व्य्त केला आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या कीव आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या दिशेने चाल करुन येत असताना, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्ध जिंकू असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमिट्रो कुलेबा म्हणाले. गुरुवारी केलेल्या संबोधनात व्लादिमिर पुतिन यांनी सैन्याला आक्रमणाचे आदेश दिले आहेत. रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये संघर्ष अटळ असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे. त्यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली ठेवण्याचे आव्हान केलं आहे. युक्रेनची लष्करीशक्ती संपवणं हा लष्करी कारवाईमागे उद्देश असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे









