पुणे \ ऑनलाईन टीम
सध्या महाराष्ट्रातील राजकारण रेमडेसिविरच्या साठेबाजीवरून चांगलेच तापले आहे. आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं?,” असा सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेमध्ये तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं?,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही रेमडेसिवीरचं वाटप केलं तर त्यात काय चुकलं? विष तर वाटत नाही ना? लोकांना इंजेक्शन हवं आहे. लोक वणवण भटकत आहेत. 22 तारखेला रेमडेसिवीर उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही, असंही ते म्हणाले. लोकांना मदत करणं चुकीचं आहे का? तुम्हीही मदत करा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. लोकांना मदत केलीच पाहिजे. भाजपचे लोक घरदार विकून लोकांना मदत करत आहे. करू द्या ना, तुम्हीही करा, असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. म्हणाले की, मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पीएचडी करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर एमफील करत आहे. आणि संजय राऊतांवर पुस्तक लिहित आहे. काय बोलावं राऊतांबद्दल. ते वर्णन करण्यापालिकडचं व्यक्तिमत्त्व आहे, अशी टीका त्यांनी केली.
Previous Article…अटक मटक चवळी चटक वाटले की काय? : चित्रा वाघ यांचा टोला
Next Article सातारा : कडक लॉकडाऊनचे पोलीस अधीक्षकांचे संकेत








