प्रतिनिधी/ आमोणे :



बोरी येथील अपघातात ठार झालेले समीर परब व सगुण गावस हे दोघेही डिचोली तालुक्यातील आमोणे येथील असून त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच गावात शोककळा पसरली. समीर हा गेल्या 8 वर्षांपासून वीज खात्यात नोकरीला होता. त्याच्यापश्चात आई, पत्नी, मुलगी व तीन भाऊ आहेत. सगुण हा अविवाहित असून गेल्या पाच वर्षांपासून वीज खात्यात कामाला आहे. त्याच्यापश्चात आई वडिल, तीन विवावाहित व दोन अविवाहित बहिणी असा परिवार आहे. पुंडलिक जल्मी हा जल्मीवाडा खांडोळा येथील असून त्याच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व दोन विवाहित बहिणी आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वीजमंत्री निलेश काब्राल यांनी सायंकाळी बांबोळी येथील गोमेकॉत जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या वीज खात्याच्या अभियंत्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली.








