प्रतिनिधी /आटपाडी
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. अशावेळी ग्रामीण रुग्णालय विटा ग्रामीण रुग्णालय आटपाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र खरसुंडी येथे ऑक्सिजनसह रुग्णवाहिका आपल्या स्थानिक विकास निधीतुन देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतला. विधान परिषद निवडीनंतर निधीचा विनियोग 3 रुग्णवाहिकेसाठी करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकायांनी पत्र देवून तात्काळ कार्यवाहीची सुचना केली.
भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवुन आपल्या स्थानिक विकास निधीतुन तब्बल ५१ लाख रुपयांच्या तीन रुग्णवाहिका प्रस्तावित करून तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे. सांगलीपासुन सुमारे १00 किलो मिटर अंतरावर असणाऱ्या आटपाडी तालुक्यात अद्यापही १०८.ची अद्ययावत रुग्णवाहिका नाही. तात्पुरत्या आणि भाड्याच्या रुग्णवाहिकेला सोबत घेवुन आरोग्य विभाग कोरोनाचे युध्द लढत आहे.
रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे मोठे हाल होत असून ही गैरसोय ओळखून अंदाजे प्रत्येकी १७लाख रूपये किमतीच्या तीन अॅम्ब्युलन्स ऑक्सिजन किटसह उपलब्ध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेत त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याला प्राधान्य दिले आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. आटपाडीसह खानापुर तालुक्याती कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठा तणाव आहे . तो कमी करत त्यांना सोयी सुविधा देण्याची गरज असून त्यातील प्रमान गरज आपल्या स्थानिक विकास निधीतुन पुर्ण करण्यासाठी आमदार पडळकर यांनी पुढाकार घेतला असुन ही गरज लवकर पुर्ण करण्याबाबत जिल्हाधीकाऱ्यांना लेखी पत्र देवून कार्यवाहीच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
विधान परिषद निवडीनंतर पहिलाच निधी कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेसाठी देण्याच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेचे तालुक्यासह मतदारसंघातुन स्वागत होत असुन आता प्रत्यक्ष रूणवाहिकेची प्रतिक्षा लागली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








