वारणानगर / प्रतिनिधी
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी आज सकाळी बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुबंईमध्ये भेट घेतली.
लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकमेकांना भेटत आहेत. या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे,हे अद्याप कळलेले नाही. दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर विविध विषयांवर चर्चा झाली यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदमदेखील उपस्थितीत होते.