प्रतिनिधी /बेळगाव
मुतगा येथील आदिशक्ती माता मंदिर बांधकामाला बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चालना दिली आहे. आमदार निधीतून यासाठी 25 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
देवस्थान कमिटीचे रायण्णा मल्लवगोळ, भागाण्णा कोंपी, मारुती मल्लवगोळ, भरमा मल्लवगोळ, मारुती कोंपी आदी उपस्थित होते. याबरोबरच होनीहाळ येथील विठ्ठल बिरदेव मंदिर उभारणीच्या कामालाही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चालना दिली. या मंदिरासाठी आमदार निधीतून 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मारिहाळ येथील मराठा सांस्कृतिक भवनच्या उभारणीसाठी गावातील प्रमुखांशी चर्चा करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
खनगाव बी. के. येथील श्री लक्ष्मीदेवीच्या मंदिर उभारणीसाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. याविषयी गावकरी व अभियंत्यांशी आमदारांनी चर्चा केली.









