प्रतिनिधी/ पणजी
वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर आता दि. 3 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मगोचे दोन, काँग्रेसच्या दहा आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि मगोचे आमदार तथा नेते सुदिन ढवळीकर यांनी आपल्या दोन आमदारांच्या विरोधात सभापती निर्णय देत नसल्याने याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. या पूर्वी दि. 28 ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित झाली होती. परंतु ती पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता मंगळवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.









