लॉकडाउनचा नकारात्मक परिणामः आयसीसीची माहिती
मुंबई :
देशाच्या सकल राष्ट्रीय राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) जवळपास सात टक्क्मयांचे योगदान देणारे रत्न आणि आभूषणे उद्योगाला कोरोना विषाणूचा वाढता विळखा आणि त्यामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हे क्षेत्र ठप्प झाले आहे. या संकटामुळे चालू वर्षात 2020 मध्ये आभूषणे आणि सोन्याची मागणी जवळपास 30 टक्क्मयांनी घसरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या मागणीत होणारी घट आणि यांचा होणारा जीडीपीवरील प्रभावाचे अनुमान इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स (आयसीसी) यांनी नोंदवले आहे. सध्या लग्न समारंभ आणि अन्य महत्त्वाचे व्यवहार थांबले आहेत. यामुळे सोन्याचे दागिने आणि सोन्याची मागणीत मोठी घसरण झाली आहे. या अगोदर 2020 मध्ये सोन्याची मागणी 700 ते 800 टन राहण्याचे अनुमान आहे. कोरोनाचा प्रसार सुरु होण्याच्या अगोदर या क्षेत्रातील किमतीमध्ये चढउतार राहिल्याने यांचा थेट परिणाम मागणीवर झाला आहे.
वर्षिक मागणी
देशात सोन्याची मागणी वार्षिक पातळीवर सरासरी 850 टनाच्या आसपास होते. परंतु कोरोनाच्या छायेमुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम म्हणून मागणीत 30 टक्क्मयांनी घट होऊन 690 टनाच्या घरात जाण्याचे संकेत आहेत. कोरोनाचा फटका आभूषणे व सोने व्यवसायात काम करणाऱया कामगार वर्गाला अधिकचा बसणार असल्याचे म्हटले आहे.









