प्रतिनिधी/ सातारा
प्रशासनाने कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश दिलेले असताना विनाकारण फिरणाऱया तसेच हॉटेल, दुकान सुरु ठेवून आदेशाचे उल्लंघन करणाऱया सातारा शहरातील 30 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 16 दुचाकीही जप्त करण्यात आलेल्या आहेत.
दि. 10 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सदरबझार परिसरातील हॉटेल ग्रीनफिल्ड सुरु ठेवून तिथे जेवण करत असलेल्या निलेश प्रकाश चव्हाण, हर्षवर्धन अभ्युदय पाटील, विराज विजय देशमुख, चंद्रसेन लालासाहेब पवार, बिजेंद्रकुमार विश्वकर्मा, अनिरुध्द धनाजी शिंदे, राहूल वसंत लखापती, अभिजित भानुदास सावंत, धैर्यशील शशिकांत फडतरे यांच्यासह हॉटेलच्या किचनमधील वैभव सुरेश लवळे, भारत विकास शिंदे, दिनेश संजय फडतरे, ओंकार सुजय जगताप अशा 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार यांनी तक्रार दिली आहे.
बाँबे रेस्टारंट परिसरात विनाकारण दुचाकी घेवून फिरणाऱया सतीश रामाआप्पा पुजारी (रा. संगमनगर, सातारा), फिरोज युसूफ इनामदार (रा. संगमनगर, सातारा), गुलाब दस्तकीर कुरेशी (रा. कोरेगाव), इम्रान अजित शेखर (रा. फलटण), सायली विकास नागे (रा. विसावानाका, सातारा), ज्योतीराम वामन माने (रा. मलवडी, ता. माण), अविनाश दिनकर नलवडे (रा. नागठाणे, ता. सातारा), प्रियांका नितनवरे (रा. खेड, ता. सातारा) तर कमानी हौदा परिसरात विनाकारण फिरणाऱया अभिजित शशिकांत पवार (रा. खिंडवाडी, ता. सातारा), गणेश बाळकृष्ण गोडसे (रा. खिंडवाडी, ता. सातारा), जाकीर हुसेन शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा, दाऊद मुशा पटवेकर (रा. शाही मशिदीसमोर, सातारा, योगेश विजय सकटे (रा. करंजे, सातारा), निसार शेख ( रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडील दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
माकर्डेयार्ड परिसरात राजेंद्र किराणा स्टोअर्स सुरु ठेवणाऱया अमोल रविंद्र राजापुरे (रा. रविवार पेठ, मार्केटयार्ड, सातारा), रविवार पेठेत दत्तछाया सर्व्हिसिंग सेंटर सुरु ठेवणाऱया संदीप मोहन क्षीरसागर (रा. रविवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.








