ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
लोकांना स्वतःच घरी कोरोना चाचणी करता येईल, अशा किटच्या वापराला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे. लुसिरा आरोग्यने हे किट बनवले असून, या किटमुळे 30 मिनिटात रिझल्ट मिळणार आहे.
नाकामधील स्त्रावाच्या सँपल घेऊन या किटद्वारे कोरोना चाचणी करण्यात येते. एका डबीमध्ये गोळा केलेला नाकातील स्वॅब नमुना घालून, ती चाचणी युनिटमध्ये ठेवली जाते. त्यानंतर 30 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात रिझल्ट युनिटच्या लाइट-अप डिस्प्लेवर दिसतो. या किटमुळे लोकांना घराच्या घरी कोरोना चाचणी करता येणार आहे.
सध्या केवळ प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या चाचण्यांसाठीच या किटचा वापर करता येईल. हे किट 14 वर्षावरील लोकांसाठी, रुग्णालये, तसेच आपत्कालीन कक्षांसारख्या पॉईंट-ऑफ-केअरमध्ये वापरण्यासाठी अधिकृत आहे.









