प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे हरविलेले एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शोधून ज्यांचे आहेत त्यांना परत करण्यात आले. ही घटना गुरुवारी अक्कलकोट शहरामध्ये दुपारी 01:00 वाजे च्या दरम्यान घडली.
चांगुबाई श्रीमंत राठोड राहणार-बोरोटी ता अक्कलकोट यांनी ‘ अक्कलकोट शहरातील सोन्याच्या दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र, कानफुले पैंजण,जोडवे, असे एक लाख आठहजार किंमतीचे खरेदी केलेले ‘सोने – चांदीचे’ दागिने खरेदी केले होते. घाई गडबडीत मुख्य रस्त्यावर कुठे तरी पडून ते दागिने हरवले आहेत असे सांगत सदरची महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. सदर घटनेचे ‘ गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक के.एस.पुजारी यांनी ‘तात्काळ डी बी पथकातील पोना चिंचोळकर , पोका राठोड,पो कॉ शिंपाळे यांना मुख्य बाजार पेठेत पाठवले. सदर कर्मचारी यांना आजूबाजूच्या ‘सिसिटीव्ही’फुटेज पाहून चंद्रकांत कटारे यांच्या दुकानात चौकशी केली असता कटारे यांनीही सदरचे सोने-चांदीचे दागिने’ सापडले आहेत. असे प्रामाणिकपणे कबूल केले. त्याबद्दल पो निरीक्षक पुजारी यांनी ‘ चंद्रकांत कटारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून ज्या महिलेचे सोने-चांदी हरवले आहे.
त्यांनाही पोलीस ठाण्यास बोलावून सोने चांदीची खात्री करूनच सुपूर्त करण्यात आले. त्यावेळी त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान सर्वाना खुपच आनंद देऊन जाणारे होते. उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याच्यां सतर्कतेमुळे एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोने चांदी दागिने परत मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचें नागरिकातून अभिनंदन केले जात आहे.








