जिल्हय़ात रुग्णसंख्या 259 वर : सक्रिय रुग्ण 46, तिघांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिह्यात रविवारी आणखी सहा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ‘कोरोना’बाधित रुग्णांची एकूण संख्या 259 वर गेली आहे. आणखी तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. तर सद्यस्थितीत 46 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिह्यात रविवारी नव्याने सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात मालवण तालुक्यातील पेंडुरमधील एक, कणकवली तालुक्यात वाघेरी एक, हरकुळ एक, कुरुंगवणे एक आणि फोंडा-कुर्ली एक असे चार तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एक वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 259 झाली आहे.
रविवारी आणखी तीन रुग्ण बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण 207 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. एक रुग्ण मुंबईला गेला. त्यामुळे जिह्यात सद्यस्थितीत 46 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच 30 संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ. क्र. विषय संख्या
1 तपासण्यात आलेले एकूण नमुने 4,366
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 4,331
3 आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 258
4 निगेटिव्ह आलेले नमुने 4,73
5 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 35
6 सध्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 46
7 इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण 1 (मुंबई)
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
9 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 207
10 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 85
11 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 4,587
12 संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 13,371









