आटपाडी / प्रतिनिधी
बर्ड फ्लुबाबत भिती बाळगण्यापेक्षा दक्षता घेण्याची गरज आहे. कोणताही पक्षी मृतावस्थेत आढळल्यास त्याची परस्पर विल्हेवाट न लावता तात्काळ प्रशासनाला सुचना करा. सर्व पोल्ट्रीधारकांनी सजग राहुन स्थलांतरीत पक्षी पोल्ट्रीलगत येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी असे निर्देश प्रांताधिकारी संतोष भोर यांनी दिले.
आटपाडी येथे बर्ड फ्लुच्या उपाययोजनांबाबतच्या बैठकीत प्रांताधिकारी संतोष भोर बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक अरूण देवकर, बीडीओ मनोज भोसले, पशुसंवर्धनचे यशोदिप कांबळे, डॉ.अविनाश चव्हाण, डॉ.लक्ष्मण गाढवे, डॉ.ए.आर.मोरे, डॉ.एस.एम.राऊत, पी.व्ही.मिसाळ, सचिन भोसले, भुमि अभिलेखच्या एस.एस.जाधव, सुभाष बाड यांची उपस्थिती होती.
आटपाडी तालुका बर्ड फ्लु नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी असुन तहसीलदार, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता बांधकाम विभाग, वन परिक्षेत्र अधिकारी, तालका भुमि निरीक्षक हे सदस्य आहेत. आटपाडी तालुक्यात २०१२च्या गणनेनुसार १ लाख ७८हजार कोंबड्या आहेत. व्यवसायिक पोल्ट्री शेड ७८ आहेत. पोल्ट्री धडका सह लोकांनी सजग रहावे कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता अंडी व चिकन बिनधास्तपणे शिजवून खावे असे आवाहन बर्ड फ्लू नियंत्रण समितीतर्फे करण्यात आले.