प्रतिनिधी /बेळगाव
‘आजादी का अमृतमहोत्सव’अंतर्गत जीआयटीतर्फे दि. 11 रोजी सायकल रॅली काढण्यात आली. युवकांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणे आणि फिट इंडिया मोहिमेचा प्रसार करणे या हेतूने ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थी विभागाचे डीन प्रा. एस. पी. देशपांडे यांनी रॅलीचे उद्घाटन केले. सदर रॅली जीआयटीपासून बेम्को, पिरनवाडी क्रॉस ते पुन्हा कॉलेज मार्गावरून फिरून आली. 45 हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचारी व प्राध्यापक यामध्ये सहभागी झाले होते.









