प्रतिनिधी / आजरा
आजरा तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे चार रुग्ण सापडले. तर शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मेंढोली येथील ८० वर्षाच्या वृधाचा मृत्यू झाला. तालुक्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला.
दरम्यान शुक्रवारी सकाळी तालुक्यातील मेंढोली, कर्पेवाडी, लाकूडवाडी, झुलपेवाडी येथील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या ६५ वर पोहोचली आहे. झुलपेवाडी येथील रुग्ण पेंढारवाडी येथे क्वारंटाइन होता. यामुळे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी कर्पेवाडी, मेंढोली व पेंढारवाडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.








