बेळगाव /प्रतिनिधी
कोरोनामुळे शहराबरोबर भाजी खरेदी-विक्री करण्यासाठी मंगळवार दि. 7 पासून सुरूवात होणार आहे. एपीएमसीमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी हा निणर्य घेण्यात आला असून तब्बल तीन महिने त्याच ठिकाणी भाजी खरेदी-विक्री होणार आहे.
एपीएमसी, आरटीओ मैदान, बी. एस. येडीयुराप्पा मार्ग आणि हिंडाल्को येथे भाजी विक्रीसाठी गाळे उपलब्ध करण्यात आले आहे. तेव्हा त्या त्या भागातील शेतकऱयांनी त्याच ठिकाणी भाजी विक्री करावी तसेच खरेदी करावी असे कळविण्यात आले आहे. येडीयुराप्पा मार्गावर 60 गाळे, आरटीओ मैदान 42 तर हिंडाल्को येथे 40 गाळे उपलब्ध करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंबाबत काळजी घेतली आहे. शेतकऱयांचा माल खेरदी करणे त्याचबरोबर त्याची विक्री करणे यासाठी शहराच्या चार ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी नवीन गाळे उपलब्ध केले आहेत. शेतकऱयांनी तसेच खरेदीदारांनी याची नोंद घेऊन त्या त्या भागात भाजीपाला विक्रीसाठी तसेच खरेदीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.








