हिंडलगा : मराठी भाषिकांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि भगव्या ध्वजासंदर्भात येत्या 25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱया महामोर्चाच्या जनजागृतीसाठी हिंडलगा येथे झालेल्या समिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत नागरिकांनी एकमुखी पाठिंबा जाहीर करून मोर्चा व काळा दिन यशस्वी करण्याचा निर्धार केला.
हिंडलगा येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते चर्चा करून समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले.यावेळी हजारोंच्या संख्येने 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या मोर्चात सहभागी होण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा काकतकर, रामचंद्र कुद्रेमनीकर, अनिल हेगडे, युवा आघाडी अध्यक्ष विनायक पावशे, मोहन पावशे, नागेश किल्लेकर, उदय नाईक, बाळू सावगावकर, अर्जुन जक्काणे, भरमा कुडचीकर, विनायक शहापूरकर, आशिष अगसगेकर, सतीश नाईक, मल्लाप्पा देवगेकर, दिनेश किल्लेकर, भाऊराव कुडचीकरसह समिती कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.









