ऑनलाईन टीम / पणजी
गोवा विधानसभेच्या निमीत्ताने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा विधानसभा २०२२ साठीचे उमेदवार जोशुआ [ भाजप ] तसेच सुधीर कांदोळकर [ काँग्रेस ] यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग केल्याच्या निमीत्ताने दोघांवर ही गुन्हा दाखल केला आहे.
निर्वाचन अधिकारी स्नेहा गीते यांनी ही कारवाई केली असून या संबंधी दोंघा उमेदवारांनवर कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या उत्तराला असहमती दाखवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.