ऑनलाईन टीम / आगरा :
आग्र्यामधील सिकंदर भागात गुरूद्वाराजवळील रस्त्यावरून जात असलेल्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये हा कंटेनर फुटपाथवर चढला आणि दुकानांसमोर झोपलेल्या 9 लोकांना याने चिरडले. यामध्ये 5 जण जागीच ठार झाले तर दोघांची हालत गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. मृतांची ओळख अजूून पटली नसून जखमी झालेल्या मधील एक जण सरकारी विकास कॉलनी सेक्टर 16 मध्ये तर दुसरा शाहगंज भागात राहणारा आहे. पोलिसांनी कंटेनर चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.
अपघात प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या लोकांनी सांगितले की, हा कंटेनर वेगात होता. घटनास्थळी वळण असल्याने चालकाचा अंदाज चुकला आणि कंटेनर फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर चढला. जवळपास 25 मीटर पुढे गेल्यावर कंटेनरचा वेग कमी झाला. या अपघातात दोन खांब देखील तुटले. तसेच याावेळी फुटपाथवर जवळपास पन्नास तेे साठ लोक झोपले होते.









