काकती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
आंबेवाडी येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
संतोष मारुती कांबळे (वय 33, रा. आंबेवाडी) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले आहे. संतोष हा गवंडी काम करत होता. मानसिक तणावातून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.









