प्रतिनिधी/ पणजी
येथील आंबेडकर उद्याना जवळ असलेले मोठे झाड उमळून मुख्य रस्त्यावर पडल्याने सुमारे एक तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होऊन रस्ता मोकळा करून वाहतूक खूली केली.
काल मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस व सोसाटय़ाच्या वाऱयामुळे संध्याकाळी 5.30 च्या सुमारास आंबेडकर उद्यानाच्या बाजूलाच असलेले मोठे झाड उमळून पडले होते. सुदैवाने कसलीही हानी झाली नाही. झाड मुख्य रस्त्यावरच पडल्यामुळे काहीवेळ वाहतूकीचा खोळंबा झाला.
अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीकृष्णा पर्रीकर, एस. एम. पेडणेकर, महेश गावस, रणजीत रेडकर, प्रविण गावकर, रॉनी डीसोझा व तनीष मठकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अवघ्या एका तासातच रस्त्यावरील झाड काडून वाहतूक सुरळीत केली.









