ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन आज 58 व्या दिवशीही सुरू आहे. शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावत आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यात आज बैठकीची 11 वी फेरी होणार आहे. याशिवाय ट्रॅक्टर रॅलीविषयी आज शेतकरी आणि पोलिसांचीही बैठक होणार आहे.
आजच्या बैठकीत शेतकरी एमएसपीवरील कायदा आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी कायम ठेवणार आहेत. दरम्यान, विज्ञान भवन येथे होणाऱ्या बैठकीसाठी शेतकरी नेते 2 बस घेऊन रवाना झाले आहेत.









