प्रतिनिधी / गुहागर
कोरोना संसर्गामध्ये गुहागर तालुक्यासाठी 108 ही रुग्णवाहिका पुरेशी नव्हती अशावेळी तालुक्यातून आलेल्या मागणीनुसार गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सुसज्ज रुग्णवाहिका गुहागर तालुक्यासाठी दिली आहे. गुरुवारी गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर ही रुग्णवाहिका तालुक्यातील जनतेसाठी लोकार्पण सोहळा करून जनतेच्या सेवेसाठी दाखल केली आहे.
या रुग्णवाहिका स्वतः चालवून हा सोहळा पार पडला आपण केवळ पत्रव्यवहार करत बसलो नाही. तर येथील जनतेची निकड पाहता रुग्णवाहिका आणण्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन तालुका वासियांच्या सेवेसाठी आज दाखल केली आहे. असे मत व्यक्त केले सदर रुग्णवाहिका 108 रुग्णवाहिकाचे धरतीवर येथील जनतेला सेवा देईल याचेही नियोजन मी केले आहे. याचबरोबर गुहागर तालुक्यात एकही ऑक्सीजन बेड नाही याकरिता आपण गुहागर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन त्या ठिकाणी 10 ऑक्सीजन बेड निर्माण करू शकतो. याची खात्री केली याकरिता तातडीने जिल्हाधिकारी यांच्याजवळ संपर्क साधून गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये 10 ऑक्सीजन बेड करताची तत्वतः मान्यता घेतले असल्याचे आमदार जाधव यांनी यावेळी सांगितले.
या कोरोना संसर्ग मध्ये घाबरून जाऊ नका परंतु काळजी घ्या असा संदेशही त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून जनतेला दिला आहे. आमदार जाधव यांनी लोकार्पण केलेल्या या रुग्णवाहिकामुळे गुहागर तालुकासाठी दोन रुग्णवाहिका कोविंड रुग्णांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
डीएम इंटरप्राईजेस एजन्सीच्या कारभारावरही ताशेरे ओढले कोविंड केअर सेंटर मधील कचरा उचलण्यासाठी व साफसफाई करण्यासाठी त्याचबरोबर रुग्णांना जेवण देण्याचा ठेका डीएम इंटरप्राईजेस या एजन्सीने घेतला आहे. या एजन्सीने स्वच्छतेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून 17 हजार रुपये पगार मिळतो परंतु ही एजन्सी या कर्मचाऱ्यांना केवळ तीन ते चार हजार रुपये पगार देत आहे. यामुळे याठिकाणी मोठा घोळ एजन्सी करत आहे. जीवनाकरिता प्रत्येक व्यक्तीला एका दिवसाकरीता शासन 120 रुपये एजन्सीला मोजत आहे.
परंतु ही एजन्सी दुसऱ्या एजन्सीकडून सत्तर रुपयांमध्ये जेवणाचा पुरवठा करून देत आहे. यामुळे डीएम इंटरप्राईजेसच्या या कारभाराबाबत ही आपण लवकरच पाठपुरावा करून कोरोना संसर्गमध्ये जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा योग्य पद्धतीने कशा पोचतील याकडे आपण अधिक लक्ष दिले आहे असेही शेवटी बोलताना सांगितले.
Previous Articleउत्तर प्रदेशात फक्त ‘जंगलराज’ : अनिल देशमुख
Next Article सई लोकूरला मिळाला जीवनसाथी









