कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये कणकवलीकडे रवाना
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना बुधवारी न्यायालयाने जामिन मंजूर केला. यानंतर गुरुवारी सकाळी त्यांना सिपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सिपीआर रुग्णालयामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना 108 रुग्णालयातून सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
आमदार राणे व त्यांचे स्वीय सहायक राकेश परब यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना ओरस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हेते. दरम्यान, राणे यांच्या वकीलांनी जिल्हा न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर शनिवारी सुनावणी होणार होती. मात्र, सोमवारी न्यायालयास सुट्टी असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. राणे यांचा त्रास वाढल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोमवारी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक संतोष परब यांना 30 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामिन मंजूर करण्यात आली. गुरुवारी सकाळी आमदार नितेश राणे यांना सिपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यांची प्रकृती अद्यापही खालावली असल्याने त्यांना 108 ऍम्ब्युलन्समधून सिंधुदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या तपासणी करण्यात आली.
तत्पूर्वी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, जयंत रावराणे, संतोष कानडे, भाई सावंत व कोल्हापूर जिह्यातील त्यांचे समर्थक सचिन तोडकर, दिलीप पाटील, दयानंद नागटिले यांच्यासह काही कार्यकर्ते दोन दिवस सिपीआर आवारात ठाण मांडून होते.