ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पटेल यांचा मुलगा फैसल यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
पटेल यांचा 1 ऑक्टोबरला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक होती. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करण्याची विनंती फैसल यांनी केली आहे.









