पुढील सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चालणार
इचलकरंजी / प्रतिनिधी
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे याचा भाचा राजू पाटील उर्फ ज्ञानदेव पाटील , कुंदन भंडारी, महेश फळणीकर या चार संशयीत आरोपीनी जामीनावर सुटका करावी, याकरीता पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. काल, बुधवारी दुपारी न्यायमुर्ती माधुरी आनंद यांनी सुनावणीअंती चारही संशयीताचा जामीनअर्ज फेटाळून लावला.
याच दरम्यान खटल्यातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यापुढील सुनावणी हि व्हिडीओ कान्फरन्सद्वारे घ्यावी, असा न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने या खटल्याची व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्यास मान्यता दिला. त्यामुळे खटल्याची ११ जुनची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आधारे जामीन मिळावा, म्हणून पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडातील चार संशयीत आरोपींनी जामीन अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी न्यायमुर्ती माधुरी आनंद यांच्या समोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी चारही संशयीत आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, या गुन्ह्यात फाशीची शिक्षा होवु शकते. या खटल्यातील मुख्य संशयीत आरोपी कुरुंदकर हा पोलीस अधिकारी तर दोन नंबरचा संशयीत आरोपी राजकीय संबंधित आहे. त्यामुळे जर आरोपींना जामिनावर सोडले तर त्याचा परिणाम खटल्यावर होण्याची शक्यता येत नाही. असा युक्तिवाद करीत जामीनासाठी दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर न्यायालयाने विशेष सरकारी वकील घरत यांनी केलेला युक्तीवादग्राह्य मानून चारही संशयीत आरोपींना जामीन देण्यास नकार दिला. या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील घरत यांच्यासमवेत एसीपी संगीत शिंदे अल्फान्सो, अश्विनी बिद्रेचे पती राजु गोरे आणि आरोपीचे वकील उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









