वार्ताहर /पारोडा
घुडो-अवेडे, केपे येथील श्री शांतादुर्गा चामुंडेश्वरी (कुडतरी महामाया) संस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार 15 ते सोमवार 17 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आज 15 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, रात्री 9वा. श्रींची पालखीतून मिरवणूक, नंतर कालोत्सव इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. रविवार 16 रोजी रोजचे धार्मिक विधी, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, रात्री 9 वा. श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत.
सोमवार 17 रोजी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, रात्री 8 वा. पावणी, नंतर श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक आदी कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान, देवतांच्या कौल-प्रसादानुसार यंदा मयूररथ व महारथ मिरवणूक होणार नसल्याचे संस्थानतर्फे कळविण्यात आले आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीनुसार शासनाने काही निर्बंध लागू केल्यास वरील कार्यक्रमांत फेरफार होऊ शकेल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन श्री संस्थान समितीने केले आहे.









