बेळगाव
एनआरएलएम विभाग जिल्हा पंचायत बेळगाव आणि विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव तालुक्यातील सांबरा विमानतळ येथे अवसर स्व साहाय्य संघाच्या वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. ग्रामीण भागातील स्वसाहाय संघांच्या सदस्यांनी स्वतः बनविलेल्या वस्तुंची मोठय़ा प्रमाणात विक्री व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘अवसर’ या नावाने सांबरा विमानतळावरविक्रीसाठी स्टॉल स्थापन केला आहे.
ग्रामीण भागातील स्वसाहाय संघांच्या सदस्यांनी स्वतः बनविलेल्या वस्तुंना विक्रीसाठी याचा उपयोग होणार आहे. सांबरा एअरपोर्टचे संचालक राजेशकुमार मौर्य, जिल्हा पंचायत योजना निर्देशक रवींद्र बंगारेप्पणवर, एअरपोर्टचे अधिकारी पी. एस. देसाई, व्यवस्थापक मरीगौडा, जिल्हा व्यवस्थापक किरण शिंदे, तालुका सुपरवायझर प्रकाश टोपी व नागरिक उपस्थित होते.









