ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये २७ जानेवारी रोजी देहदान व अवयवदान महासंघ नाशिक यांच्या अवयवदान पदयात्रेचे स्वागत प्रभारी अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी केले. ही पदयात्रा नाशिक ते बेळगावी अवयवदानाचे जनजागरण करणार आहे. सुनिल देशपांडे हे यात्रेचे संयोजक व समन्वयक आहेत. त्यांच्यासह शरद दाऊदखानी, अविनाश कुलकर्णी व प्रशांत पागनीस हे या पदयात्रेत सहभागी झाले होते.
डॉ अजय चंदनवाले म्हणाले, ससूनने अवयवदानाच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. यापूर्वी ससूनतर्फे पुणे शहरामध्ये अवयवदान रॅलीचे आयोजन केले होते व अवयवदानविषयी जनजागृती केली होती. आतापर्यंत ससून रुग्णालयाने १९ किडनी प्रत्यारोपण ब ४ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.









